‘लोटिस्मा’चे प्रतिष्ठेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

रविवारी (आज) वितरण; ज्येष्ठ गजलकार प्रा. कैलास गांधी यांची उपस्थिती

चिपळूण :: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रतिष्ठेचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. दापोली येथील ज्येष्ठ गजलकार प्रा. कैलास गांधी यांचे हस्ते रविवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजता, लोटिस्माच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न होईल.

कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये, कविवर्य माधव केशव काटदरे आणि कविवर्य वि. ल. बरवे उर्फ कवी आनंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार प्रदान केले जातात. कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मृदंगी काव्य पुरस्कार “जामीनावर सुटलेला काळा घोडा” या कविता संग्रहासाठी धनाजी घोरपडे (बहादूरवाडी, सांगली) यांना, कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये समीक्षा पुरस्कार “वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र” विजय जोशी (डोंबिवली) यांना, कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये कांदबरी पुरस्कार “ऊसकोंडी” या कादंबरीसाठी डॉ. श्रीकांत पाटील (धुणकी, हातकणंगले, कोल्हापूर) यांना, कथा संग्रहासाठीचा कवी माधव पुरस्कार “कथा विविधा” या कथासंग्रहासाठी प्रा. सुहास बारटक्के (चिपळूण) यांना, कथा संग्रहासाठीचा कवी आनंद पुरस्कार “शापित हवेली” या कथा संग्रहासाठी अविनाश बापट (हिंदळे, देवगड) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे, कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button