
आता एक-दोन गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येणार
शेतकर्यांना रस्ते, विहीर आदी कारणांसाठी एक-दोन गुंठ्यातील जमीन खरेदी-विक्री करावी लागते. त्यावेळी शेतकर्यांसमोर येणारी अडचण लक्षात घेवून राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून त्या कायद्यात शिथिलता आणली आहे. यामुळे शेतकर्यांना आता रस्ते, विहीर, घरकुलांसाठी एक-दोन गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार आहे.तुकडेबंदी कायद्यात आणण्यात आलेल्या शिथिलतेमुळे चार कारणांसाठी गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार आहे. राज्य सरकारने ५ मे २०२२ रोजी राजपत्र प्रसिद्ध केले होते. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिरायत जमिनीसाठी २० गुंठे, बागायती जमिनीसाठी दहा गुंठे, प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले. म्हणजेच या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी-विक्री होणार नाही. काही शेतकर्यांना रस्ते, विहीर आदी कारणांसाठी एक-दोन गुंठ्यातील जमीन खरेदी-विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकर्यांची ही अडचण लक्षात घेवून राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली आहे. कायद्यात सुधारणा करण्याबाबतचे प्रारुप राज्य सरकारने १४ जुलै २०२३ रोजी जहीर केले होते. या प्रारूपावर मागविण्यात आलेल्या हरकती, सूचना निकाली काढून प्रारूप अंतिम करण्याचे राजपत्र १४ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. विहीर, शेतरस्ता, सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी आता केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी तुकड्यातील जमिनीचा व्यवहार करता येणार आहे. मात्र याकरिता जिल्हाधिकार्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. www.konkantoday.com