रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगाव मयेकरवाडी येथे विवाहितेची अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास
_रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगाव मयेकरवाडी येथे विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 29 मार्च रोजी मध्यरात्री 1 वा. सुमारास उघडकीस आली.सोनाली सुशांत मोरे (24,रा.शिरगाव मयेकरवाडी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाउ शुभम सुनिल लाकडे (रा.कासारवेली,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, सोनालीच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. शुक्रवारी मध्यरात्री तीने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब तिच्या पतीच्या निदर्शनास येताच त्याने तिला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालया दाखल केले असा तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी तिला तपासून मृत घोषित केलेWww.konkantoday.com