राजापूर तालुक्यातील सागवे हमदारेवाडी येथील ८ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

*__राजापूर तालुक्यातील सागवे हमदारेवाडी येथील राहुल राजू पर्येंकर या ८ वर्षीय मुलाच्या सर्पदंशाने मृत्यू झाला त्याला देवगड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टर यांनी तो मयत झाल्याचे सांगितले .ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ बेळगाव खानापूर पिंपरी येथील राजू पर्येकर हे गेले चार वर्षापासून कामानिमित्त सागवे हमदारेवाडी येथे पत्नी एक मुलगा व दोन मुली यांच्यासोबत राहत असून शुक्रवारी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या घरी पत्नी आणि मुले होती. शुक्रवारी सुट्टी असल्याने सर्व मुले एकत्रित घराच्या पाठीमागे असलेल्या कलम बागेत खेळत होती. दुपारी जेवण आटपून पुन्हा खेळण्यास गेली. यावेळी राहुल यांच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला. मात्र त्याने आपल्या पायाला काटा टोचला आहे असे आईला सांगितले.या दरम्यान त्याला चक्कर येऊन येऊ लागल्याने तेथीलच कातळी येथील डॉक्टरांकडे नेण्यास आले. त्यांनी उपचारासाठी देवगड येथे पाठविले. मात्र देवगडमध्ये खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारा पूर्वीच तो मयत झाला असल्याचे सांगितले. राहुल हा इयत्ता दुसरी मध्ये शिकत होता. आणखी दोन महिन्यांनी 22 जून रोजी त्याचा वाढदिवस होता. तत्पूर्वी त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने सागवे गावात हळहळ व्यक्त होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button