मंत्री नारायण राणे या मतदारसंघातून निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा-भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालसेकर
रत्नागिरीसिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर मंत्री नारायण राणे यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांनीच या मतदारसंघातून निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या मतदारसंघात कमळ निशाणीवरच निवडणूक लढविली जाईल हे निश्चित आहे. त्यादृष्टीने कामाला लागलो आहोत.शुक्रवारी तिन विधासभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. उमेदवार भाजपाचा असला तरी महायुती म्हणून हि निवडणूक लढविली जाणार असल्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालसेकर, माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे.यावेळी बाळ माने म्हणाले, उमेदवार कोण हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जाहीर करतील. मात्र स्थानिक पातळीवर आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. तिनही विधानसभा मतदारसंघातील १ हजार ७ बुथवर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपुर्ण मतदारसंघात भाजपाचे ५० हजार कार्यकर्ते सक्रिय असून त्याला महायुतीतील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची जोड मिळेल. जागावाटपाबाबत तिढा नाही. येथील उमेदवार कमळ चिन्हावरील असेल हे निश्चित आहे. त्यामुळे आम्ही फिल्डवर काम सुरु केले आहे.प्रत्येक विभागात एका नेत्याचे नाव असते. त्यांच्या नावावरुन मतदारसंघ ओळखला जातो. त्याप्रमाणे मंत्री नारायण राणे यांच्या नावाने हा मतदार संघ ओळखला जातो. त्यामूळे सहाजिकच येथे राणे उमेदवार असतील. मात्र त्यांची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस करतील. महायुतीतील मित्रपक्षांची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे, असे काळसेकर यांनी सांगितले. या बैठकीला लोकसभा संयोजक, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सांवत, तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांच्यासह चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर येथील प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.www.konkantoay.com