
कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे प्रथमच दोन कातळशिल्पे सापडली
कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे प्रथमच दोन कातळशिल्पे सापडली असून ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याची माहिती इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांनी दिली. यामुळे आता कणकवली तालुकाही जगाच्या नकाशावर झळकणार आहे.तोंडवली येथील विनोद सुर्यकांत बोभाटे व त्यांचे मित्र दुर्ग संवर्धनाच्या कामात सक्रिय असून आपल्या गावातही पुरातन काही अवशेष सापडतात का? याचा ते शोध घेत होते. त्यांना आपल्या गावातील डोंगरावर काही वैशिष्ट्यपूर्ण पुरातन गोष्टी आढळल्या, पण त्याचा नेमका अर्थ त्यांना उलगडत नव्हता. गेल्याच आठवड्यात मुणगे येथे सापडलेल्या कातळचित्राची बातमी वाचून त्यांनी इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांना केलेल्या फोनमुळे त्यांनी आपले सहकारी अजित टाककर यांच्यासोबत या भागाला भेट दिली आणि या कातळशिल्पाबाबत शिक्कामोर्तब झाले.यावेळी कणकवली तालुक्यातील नांदगाव आणि तोंडवली या दोन गावांच्या सीमेवर दोन वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्रे आढळून आली.www.konkantoday.com