आमदार राजन साळवींच्या मुलाची एसीबीकडून चौकशी
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी आमदार राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी यांची २८ मार्च रोजी लाचलुचपत विभागाकडून कसून चौकशी करण्यात आली. नुकतीच राजन साळवी यांच्या पत्नीचीही चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्यात आली होती. तर राजन साळवी यांनाही वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येत असते. गुरूवारी सकाळीच शुभम साळवी हे चौकशीसाठी लाचलुचपतच्या कार्यालयात हजर झाले होते.आमदार राजन साळवी, त्यांचा मुलगा शुभम व पत्नी अनुजा यांच्याविरूद्ध साडेतीन कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती.गुन्हा दाखल होताच अटक होण्याच्या शक्यतेने आमदार साळवी यांची पत्नी व मुलाने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. मात्र हा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला होता. www.konkantoday.com