
पोलिसांच्या नव्या दंडाच्या प्रणालीमुळे कोल्हापुरातील गुन्हा झाला रत्नागिरीत उघड
बेकायदेशीर पार्किंगमध्ये वाहने उभे करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट कॅमेरामधून फोटो काढून त्यांच्या नावावर दंड फाडण्याची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे अनेकांना त्याची झळ बसल्याने याविरुद्ध ओरड होत असतानाच आता या प्रणालीमुळे कोल्हापुरात घडलेला गुन्हा रत्नागिरीत उघड झाला
स्क्रॅप केलेल्या रिक्षाला रत्नागिरीतील रिक्षेचा क्रमांक वापरुन कोल्हापूर शहरात बनावट नंबरच्या आधारे रिक्षा व्यावसाय करणाऱ्या तरुणाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रिक्षाला दंड झाल्यानंतर, मूळ मालकाला आपल्या गाडीचा नंबर वापरुन कोल्हापूरात दुसरी रिक्षा व्यावसाय करत असल्याचे समजले. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभोध मेडसिकर यांच्या पाठपूराव्यामुळे रत्नागिरीतील गरिब रिक्षा व्यावसायिकाला न्याय मिळाला आहे.
रत्नागिरी शहरनजिकच्या शिरगांव येथील फैयाज दिलावर शेख हे गेली अनेक वर्ष रत्नागिरी शहरात रिक्षा व्यावसाय करतात. ते एमएच ०८ ई ६५७६ या रिक्षावर व्यावसाय करत असताना दि. ०६ जून रोजी त्यांना त्यांच्या रिक्षावर कोल्हापूर येथे कारवाई झाल्याचे मेसेज आला.कोल्हापूर वाहतूक पोलीस, कोल्हापूर आरटीअोंनीही कारवाई केली असल्याने त्यांच्या रिक्षेचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आला होता.
दि.२१ जून रोजी त्यांनी रत्नागिरी उपप्रादेशिक अधिकारी सुभोध मेडसिकर यांची भेट घेतली. त्यांना वस्तूस्थिती सांगितली. ज्यादिवशी रिक्षावर कारवाई झाली आहे. त्या दिवशी आपण रत्नागिरीतच होतो. तर रिक्षा घेवून आपण कोल्हापूरला केव्हाच गेलो नसल्याचे सांगितले. यावरुन फैयाज शेख यांच्या रिक्षेचा क्रमांक वापरुन इतर कोणी कोल्हापूर शहरात व्यावसाय करत असल्याचे स्पष्ट झाले होते.
आरटीओ श्री. मेडसिकर यांनी तात्काळ कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी तानाजी सावंत यांना या प्रकाराची माहिती दिली. श्री.सावंत यांनी तात्काळ शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरिक्षक स्नेहा गिरी यांना माहिती कळविली. त्यांनी पोलीस उपनिरिक्षक एम. एम. चौगुले , पोलीस कर्मचारी जरग, पोरे, जांभळे, कारेकर, भोसले यांच्या मदतीने बनावट नंबरच रिक्षा शोधून काढली.
कोल्हापूर शहरात स्क्रॅप केलेली रिक्षा घेवून त्या तरुणांने त्याला रत्नागिरीतील रिक्षेचा क्रमांक लावला होता. रत्नागिरीतील रिक्षा कोल्हापूरत कशी व्यवसाय करते. या करणावरुन पार्किंगमध्ये उभी असताना रिक्षेवर कारवाई केली होती. त्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. संबधीत तरुणावर राजवाडा पोलीस स्थानकात भादंविक ४२०, ४६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com