रेशन दुकानावर दिलेल्या पॉस मशिनमध्ये डोळे स्कॅन करण्याची सुविधा नाही
नवीन पॉस मशिनमध्ये हातांच्या ठशांसोबत आता डोळ्यांचे बुब्बुळ स्कॅन करून रेशन देण्याची सुविधा आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या नवीन पॉस मशिनमध्ये ही सुविधा अद्याप अद्यावत केलेली नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजही हाताचे ठसे स्कॅन करुनच रेशन घ्यावे लागत आहे. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे वयोमानामुळे स्कॅनल मशिनवर स्कॅनच होत नसल्याची अडचण कायम आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये पुरवठा विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या पॉस मशिन आता रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. www.konkantoday.com