
केंद्रीय मंत्री नारायण राणे आजही पूर्वीच्या दादागिरीच्या भूमिकेत वावरत आहेत, खा. विनायक राऊत
केंद्रीय मंत्री नाररायण राणे लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धमकी दिली आहे की भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोललात तर सिंधुदुर्गातून मुंबईला मागे जावू देणार नाही. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आजही पूर्वीच्या दादागिरीच्या भूमिकेत वावरत आहेत. हे सिद्ध झाले आहे. अशा शब्दात ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राणेंची दादागिरीची भाषा मतदार खपवून घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.www.konkantoday.com