चौपदरीकरणाच्या त्रासात भर; अपघाताचे वाढले प्रमाण
मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहनांच्या वर्दळीचा आधीच त्रास सुरू आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती ओव्हरलोड वाहतुकीची. ओव्हरलोड वाहतुकीमुळे ट्रक, डंपरसारख्या वाहनांमधून रस्त्यावर माती, खडी पडण्याचे प्रमाण वाढले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक नियमांना हरताळ फासले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) याकडे लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. हातखंब्याजवळ मार्गावर दोन दिवसापूर्वी सकाळच्या सुमारास माती वाहतूक करणाऱ्या डंपरमधून रस्त्यावर मातीचा ढिगारा पडला. रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर माती पसरल्याने वाहतूककोंडी झाली होती. ही माहिती हातखंबा वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला; मात्र ही खडी, माती वाहतूक करणारी वाहने नियम न पाळता ये-जा करत असतात. या वाहतुकीकडे आरटीओ विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. www.konkantoday.com