महायुतीत वादात अडकलेल्या नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, औरंगाबाद, उत्तर- पश्चिम मुंबई या जागांवर अद्याप निर्णय नाही
महाविकास आघाडीत चर्चा सुरू असतानाही उद्धव ठाकरे यांनी सांगली, उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागेवरील उमेदवार जाहीर करून टाकले होते. मात्र, महायुतीत वादात अडकलेल्या नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, औरंगाबाद, उत्तर- पश्चिम मुंबई या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार जाहीर केले नाहीत.त्यांनी गुरुवारी जाहीर झालेल्या आठ जागांपैकी सात ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी दिली.
वादग्रस्त जागांना हात न लावण्याचे धोरण शिंदे यांनी अंगीकारल्याचे त्यांच्या पहिल्या यादीवरून दिसते. नाशिकवरून शिंदे गट अन् अजित पवार गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिकचे खा. हेमंत गोडसे उमेदवारीसाठी सातत्याने शिंदेंना भेटत आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिंदेंकडे जोर लावला आहे.
औरंगाबादची जागा आपल्याकडे घ्या, असा तेथील नेत्यांचा शिंदेंवर दबाव कायम आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.ठाणे आणि पालघर भाजपला २ हवे आहे, शिंदे या जागा सोडायला तयार नाहीत, असे चित्र आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित हे शिंदे गटाचे खासदार आहेत. शिंदे ‘ठाणेदार असल्याने अडले आहेत. औरंगाबाद, सिंधुदुर्ग-रत्नागिरी व ठाणे वगळता वादातील अन्य खासदार शिंदे गटाचे आहेत.
www.konkantoday.com