बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार व विजय शिवतारे यांच्या वादात उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी

_बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार व विजय शिवतारे यांचा वाद शमण्याची चिन्ह नव्हती. पण, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद आता शमवण्यात य़श आले आहे.दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजितदादा आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई झाली आहे.बुधवारी रात्री उशीरा झालेल्या एका बैठकीत हा समेट झाला. आज शिवतारे पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहे.याअगोदर शिवतारे यांनी बारामतीतून १२ एप्रिलला १२ वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणाच करुन टाकली होती. त्यामुळे बारामती सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार व विजय शिवतारे यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पण, शिवतारे यांचे बंड शमवण्यात यश आल्यामुळे आता आमनेसामने सामना बारामतीत रंगणार आहे..www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button