सिंधुुदुर्गची सुकन्या वृषल पाटणकर करणार अमेरिकन पार्लमेंटचे प्रतिनिधीत्व
अगदी शालेय वयात अमेरिकन राजनिती (डिप्लोमसी) क्षेत्रात विशेष रूची दाखवणार्या अमेरिकास्थित सिंधुदुर्गची सुकन्या वृषल रितेष पाटणकर हिला यंग डिप्लोमॅटस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला असून तिला आता अमेरिकन राजनितीचा जवळून अभ्यास करण्याकरिता थेट अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये सिनेट मेंबर्सच्या खांद्याला खांदा लावून बसण्याची संधी प्राप्त झाली आहे.तब्बल दोन महिने ती अमेरिकेच्या पार्लमेंट हाऊसमध्ये बसून तिथे पास होणारी बिले व तयार होणार्या नव्या कायद्यांचा व त्या अनुषंगाने होणार्या चर्चेचा अभ्यास करणार आहे. आपल्या सूचनाही मांडण्याची संधी तिला मिळणार आहे. अतिशय कमी वयात फार मोठी संधी मिळालेली वृषल ही पहिली भारतीय मुलगी ठरली आहे. www.konkantoday.com