
मुंबई-गोवा महामार्गावर सोनवी पुलावरून कार नदीत कोसळली, पाचजण जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या ब्रिटीशकालीन सोनवी पुलावरून इर्टीगा गाडी नदीत जावून कोसळली. या अपघातात ५ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास घडली.राजेंद्र वासुदेव अपराज (नालासोपारा), महेश शांताराम अपराज, नंदकुमार शांताराम टेमुलकर (मालवण), दीपक विलास अपराज, सुहास एकनाथ अपराज हे या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. www.konkantoday.com