
लांजा तालुक्यातील प्रसिद्ध खोरनिनको धबधबा परिसरात १४४ कलम लागू
लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी धबधब्यावरील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून खबरदारीचा उपाय म्हणून वेरवली धरण धबधबा आणि खोरनिनको धबधबा येथे १९ जूनपासून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तर शनिवार, रविवारी या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या राजापूर कळसवली येथील २६ वर्षीय तरूणाचा रविवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यानंतर या धरण प्रकल्प व धबधब्याकडे जाणार्या पर्यटकांना मज्जाव करण्यात आले होते. मात्र तरीही पर्यटक आदेश धाब्यावर बसवून त्या ठिकाणी जातात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस व पाटबंधारे विभाग सतर्क झाले आहेत. १९ जूनपासून १९ डिसेंबरपर्यंत लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी लांजा पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार बेर्डेवाडी धरण व खोरनिनको मुचकुंदी धरण धबधबा परिसरात १४४ कलम लागू करून मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.www.konkantoday.com