दापोली- मंडणगड मार्गावर पालगड दोन दुचाकीस्वारांच्या झालेल्या भीषण धडकेत एकाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू.

दापोली- मंडणगड मार्गावर पालगड शिरखल पुलाजवळ दोन दुचाकीस्वारांच्या झालेल्या भीषण धडकेत झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील पालगड येथील विकास नरहर काळे वय 3.३ यांचा स्पोर्ट्स बाईकच्या झालेल्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाला आहे.रविवारी सकाळी १०.३० वा चे सुमारास विकास काळे हे पिग्मी जमवण्याकरता त्यांच्या सुझुकी कंपनीची अंक्सेस १२५ (गाडी नं MH -08AM- २८९२) हि पालगड मंडणगड दिशेला जात असतांना दापोली दिशेने येणारी तन्मय सुनिल जगताप रा.पुणे यांच्या ताब्यातील मोटार सायकल ट्राएम कंपनीची स्कॅमलर गाडी नं (MH- 12-XC-०३३०) या गाडीने मागुन येवुन शिरखल पुल या ठिकाणी जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातात विकास नरहर काळे हे रस्त्याच्या मध्यभागी फेकले गेले यावेळी त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत होऊन रक्तस्राव झाला. या अपघाताची माहिती कळताच पालघर येथील विनय एकनाथ जोशी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. करंदिकर हॉस्पीटल पालगड येथे नेले असता डॉ. अशोक करदिकर यानी त्यांचे उजवे हाताला ड्रेसीग करुन पुढील उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे तात्काळ हलवण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास काळे यांना तपासून मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button