
लांजा साटवली मार्गावर गोळवशी येथे एसटी आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक.
लांजा साटवली मार्गावर गोळवशी येथे एसटी आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलवर गंभीर जखमी होण्याची घटना आज बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली आहे.अपघातात गंभीर जखमीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे .याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लांजा आगारातून सुटलेली लांजा शेळवी बस क्रमांक एम एच 14 बी टी २४४६ हे लांजाहून साटवली शेळवीकडे जात असताना गोळवशी आमटे ची वाडी येथे साटवलीहून लांजाकडे जाणाऱ्या मोटर सायकल स्वार समीर गवंडी याची मोटरसायकल क्रमांक एम एच ०८ ए ए ०४६८ त्यांच्यात समोरासमोर धडक झाली .या अपघातात मोटरसायकलस्वारगंभीर जखमी झाला.