
तीन वर्षे उलटली तरी त्या परीक्षांचा निकाल नाही, मुंबई विद्यापीठाच्या विरोधात हायकोर्टात याचिका
न्यायवैधक शास्त्र आणि सायबर कायद्याच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा तीन वर्षापूर्वी घेवूनही परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभारावर प्रकाश टाकणार्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने तीन वर्षापूर्वी घेतलेल्या परीक्षांचा निकाल अद्याप का जाहीर केला नाही, असा सवाल उपस्थित करून मुंबई विद्यापीठ आणि नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेजला स्पष्टीकरण देण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी ३ एप्रिलला निश्चित केली. www.konkantoday.com