खाऊसाठी दिलेल्यापैशांवरुन भावासोबत वाद ,अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला
_पावस तालुक्यातील गोळप येथे खाऊसाठी दिलेल्या पैशांवरुन भावासोबत वाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला. मुलाच्या वडिलांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.निरज कुमार राजेंद्र चौधरी (१४, रा. गोळप, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत अल्पवयीन मुलाचे वडिल राजेंद्र शिवजतन चौधरी (४४, मुळ रा. बिहार सध्या रा. गोळप, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.www.konkantoday.com