
देवरुखमध्ये पार पडले ‘धनेशमित्र संमेलन
_२३ मार्च रोजी देवरुखमध्ये पार पडलेल्या ‘धनेशमित्र संमेलना’त करण्यात आला. कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेले ‘धनेशमित्र निसर्ग मंडळ’ आणि देवरुख मधील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.देवरुखमधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एस.के.पाटील सभागृहात शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत महाराष्ट्रातील पहिले ‘धनेशमित्र संमेलन’ पार पडले. या संमेलनाला ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’ आणि ‘गोदरेज कन्झुमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ यांनी अर्थसहाय्य पुरवले. संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर ‘देवरुख शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष सदानंद भागवत, ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे, ए.एस.पी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’चे वन्यजीव संशोधक डाॅ. रोहित नानिवडेकर आणि वनस्पती अभ्यासक डाॅ. अमित मिरगळ हे उपस्थित होते. ‘कोकणात ककणेर म्हणून ओळख असलेल्या या पक्ष्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे. कोकणात केली जाणारी निसर्गाची पूजा हीच वन्यजीव संवर्धनाचा पाया आहे,’ असे प्रास्ताविक सदानंद भागवत यांनी केले. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी संमेलनाच्या पहिल्या सत्रात कोकणातील धनेश पक्ष्यांच्या नोंदीविषयी माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरा लावून देवरुखमध्येधनेश पक्ष्यांच्या प्रजनन क्रिया कशा पद्धतीने नोदवल्या जात आहेत, याविषयी त्यांनी पुढे माहिती दिली.. रोहित नानिवडेकर यांनी खुल्या स्वरूपाच्या चर्चासत्रामधून स्थानिकांना कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनामध्ये असलेल्या आव्हानांविषयी बोलते केले. यावेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. हवामान बदलामुळे घरट्यांवर होणारा प्रभाव तपासण्यासाठी वर्षांनुवर्षांच्या नोंदी आणि मोठ्या संख्येने धनेशाच्या घरट्यांचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे. हे निरीक्षण ‘सिटीझन सायन्स प्रोग्राम’अंतर्गत करता येऊ शकते, असे मत नानिवडेकर यांनी सत्राअंती मांडले. या सत्रानंतर ‘महाएमटीबी’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ निर्मित महाधनेश पक्ष्यावरील माहितीपटाचे सादरीकरण झाले.www.konkantoday.com