
रत्नागिरी शहर नळपाणी पुरवठा योजना, आढावा बैठक *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थिती मधे संपन्न
आज रत्नागिरी शहरातील नळपाणी पुरवठा योजने संधार्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे संपन्न झाली.या वेळी आज पर्यंत झालेले काम आणि उर्वरीत काम संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पावसाळा तोंडावर आल्याने उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे जेणे करून पाईपलाईन साठी उकरलेले रस्ते दुरुस्त करता येतील असे निर्देश संबंधित ठेकेदार आणि उपस्थित अधिकारी वर्गाला दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी मिश्रा साहेब,निवासी उपजिल्हाधिकारी भडकवार नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, मुख्याधिकारी नगरपरिषद रत्नागिरी, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण श्री वानखेडे, उप अभियंता सोहोनी साहेब,शाखा अभियंता संतोष सावंत व सबंधित अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com