कोल्हापूर कागल येथे सॅनिटायझर बाटलीचा स्फोट होऊन गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू

घरातील केरकचरा पेटवताना कचर्‍यात असणार्‍या सॅनिटायझर बाटलीचा स्फोट होऊन गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचा शनिवारी रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सौ. सुनीता धोंडिराम काशिद ( दत्तनगर, ता. कागल) असे मृत महिलेचे नाव आहे.
चार दिवसांपूर्वी सुनीता काशिद घराची झाडलोट झाल्यानंतर सर्व कचरा घराच्या बाहेर मोकळ्या जागेत पेटवत होत्या. या कचर्‍यात सॅनिटायझरची बाटलीही होती. कचरा पेटविल्यानंतर अचानक बाटलीचा स्फोट होऊन त्यातील काही सॅनिटायझर काशिद यांच्या अंगावर उडाले. त्यामुळे कपड्यांनी पेट घेतला. यामध्ये त्या ८० ते ९०टक्के भाजल्या होत्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button