केवायसी अपडेट केले नसल्या ग्राहकांचे फास्टॅग अकाऊंट 1 एप्रिलपासून बंद केले जाणार
_फास्टॅगचे केवायसी करणे महत्त्वपूर्ण असून जर ग्राहकांनी फास्टॅगचे केवायसी बँकेतून अपडेट केले नसल्यास अशा ग्राहकांचे फास्टॅग अकाऊंट 1 एप्रिलपासून बंद केले जाणार आहे. केवायसी नसलेले फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट केले जातील.फास्टॅगमध्ये शिल्लक रक्कम असूनही पेमेंट करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फास्टॅग केवायसीसाठी फक्त आठ दिवस उरले आहेत. एनएचएआयने फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. जेणेकरून फास्टॅग सुविधा कोणत्याही अडचणीशिवाय प्रदान करता येईल. पारदर्शकता आणण्यासाठी आणि फास्टॅगद्वारे टोल वसूल करण्यासाठी टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी एनएचएआयने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ मोहीम सुरू केली आहे.www.konkantoday.com