एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
_मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी आज (26 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.मागील काही दिवसांपासून आढळराव-पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीपासूनच राज्यातील शिरूर (Shirur) मतदारसंघाची चर्चा जोरदार सुरू होती. मात्र, या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोण असणार हे निश्चित झालं नव्हतं. कारण हा मतदारसंघ अजित पवारांकडे गेला होता आणि या जागेसाठी शिंदे गटाचे आढळराव-पाटील इच्छुक होते. त्यामुळे आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आम्ही त्यांना उमेदवारी देऊ, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली होती. यावर युतीत एकमत झालं. त्यानंतर आढळरावांनी हातात घड्याळ बांधण्याचं ठरवलं आणि आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.www.konkantoday.com