राजापुरात आज पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा
__राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील खालावलेला पाणीसाठा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शीळ जॅकवेलच्या येथून पाणीसाठा होण्यामध्ये अडथळे येत आहेत.यामुळे शहराला टंचाईचे चटके बसू लागले आहेत. नगरपालिका प्रशासनाने शहरामध्ये मंगळवारपासून (ता. २६) शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. . गेल्या महिन्यामध्ये पालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली होती. त्यानंतर घटणाऱ्या पाणीसाठ्यामुळे आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा कमी झाल्याने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.www.konkantoday.com