महामार्गाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला केर्ली मध्ये भीषण आग; 20 लाखांचे नुकसान!!
कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावरील केर्ली इथं एका गोडाऊनला भीषण आग लागली. या गोडाऊन मधील साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्यीच प्राथमिक माहिती मिळत आहे.रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गाचे काम चालू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य केर्ली परिसरातील गोडाऊन मध्ये साठवण्यात आले होते. अचानक या गोडाऊनला भीषण आग लागली.या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल घटनास्थळी पाेहचले. अग्निशमन दलच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेच कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान 15 ते 20 लाख रुपयांचा साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.www.konkantoday.com