एमएचटी-सीईटी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘नीट’ या परीक्षा एकाच दिवशी
_राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात दोनच दिवसांपूर्वी बदल केला होता.लोकसभा निवडणुकीमुळे हा बदल करण्यात आला होता. मात्र सुधारित वेळापत्रकातील एमएचटी-सीईटी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘नीट’ या परीक्षा एकाच दिवशी आल्याने आता पुन्हा वेळापत्रकात बदल करण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे.लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने दोन दिवसांपूर्वी अभियांत्रिकी, विधी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदलले होते. त्या सुधारित वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटी परीक्षेत ५ मे रोजी पीसीएम गटाची परीक्षा होणार होती. मात्र राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार याच दिवशी नीट यूजी (वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रम) परीक्षा होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.www.konkantoday.com