रत्नागिरी शहरात भाटे येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथील एका विद्यालयामागे तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वा. सुमारास उघडकीस आली.ॠषीकेश विलास पवार (25,रा.कोळंबे बागवाडी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाउ ॠत्विक विलास पवार (23, रा.कोळंबे बागवाडी, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी 5 वा. सुमारास ॠषीकेश आणि ॠत्विक हे दोघे दुचाकीवरुन नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर ॠषीकेशने भाउ ॠत्विकला पुलाजवळ सोडून तो दुचाकीवरुन रत्नागिरीच्या दिशेने गेला होता.
त्यानंतर काही वेळाने ॠत्विक हा ॠषीकेशला फोन करत होता. परंतू तो फोन उचलत नव्हता म्हणून ॠत्विक त्याचा मित्र प्रणय पवारला घेउन ॠषीकेशचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. सायंकाळी 7 वा. सुमारास ते दोघेही भाट्ये येथील एका विद्यालयाच्या मागील बाजूस गेले असता त्यांना एका झाडाच्या फांदीला ॠषीकेश पंचाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. दोघांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी ॠषीकेशला तपासून मृत घोषित केले.