
एकीकडे धुळवड उत्साह आणि खगोलप्रेमींसाठी चंद्रग्रहणाची पर्वणी असे दोन योग
फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी होळीनंतर धुळवड खेळण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.यावर्षीची होळी खास आहे, कारण 100 वर्षांनंतर होळी आणि धुळवड असताना चंद्रग्रहणाचा योग आला आहे. या वेळी 100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण होत आहे.ग्रहणकाळ कधी सुरू होणार आणि या कालावधीमध्ये धुळवड खेळता येणार का सुतक काल कधी याबाबत अनेक जणांमध्ये संभ्रम आहे. ग्रहण कुठे आणि कधी दिसणार याबाबतही उत्सुकता आहे. त्यामुळे एकीकडे धुळवड उत्साह आणि खगोलप्रेमींसाठी चंद्रग्रहणाची पर्वणी असे दोन योग जुळून आले आहेत.या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला लागणार आहे. या दिवशी अनेक भागांमध्ये धुळवड खेळली जाते. होलिका दहन आणि होळीच्या दिवशी ग्रहणावर सुतकची सावली असेल. हे चंद्रग्रहण सकाळी 10:24 ते दुपारी 3:01 पर्यंत राहील. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 36 मिनिटे असेल. वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण असलं तरी ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात कोणताही सूतक काल पाळला जाणार नाही. हे चंद्रग्रहण युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या भागांमध्ये दिसणार आहे.www.konkantoday.com