
चिपळूणच्या मुईजने पटकावला सुपर रँडोन्यूअरचा किताब
पुणे येथे शनिवारी पार पडलेली पुणे-निझामपूर-पुणे २०० किलोमीटर बीआरएमची इव्हेंट निर्धारित वेळेत पार करत चिपळूणच्या मुईज समीर दळवी याने लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये मानाचा असणारा सुपर रँडोन्यूअर किताब पटकावला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी वयात मुईजने हा किताब पटकावला आहे.सुपर रँडोन्यूअर किताब मिळविण्यासाठी २००, ३००, ४००, ६०० कि.मी.या सर्व लांब पल्ल्याच्या बीआरएम सायकल इव्हेंट साईड मुईजने दोन महिन्यात पूर्ण केल्या. यासाठी मुईज गेले पाच ते सहा महिने सराव करत होता. यात सातत्य ठेवत त्याने सुपर रँडोन्यूअर किताब जिल्ह्यात सर्वात कमी वयात पटकावला.www.konkantoday.com