रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत
गेल्या काही वर्षांपासून राजापूर तालुक्यासह कोकणामध्ये चर्चेत असलेला रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.नाणार आणि बारसू-सोलगाव परिसरातील रिफायनरी समर्थकांनी एकत्रित येत रिफायनरी उभारण्याचा नारा दिला तर रिफायनरी विरोधकांनी संपर्क अभियानाच्या माध्यमातून रिफायनरीविरोधात शड्डू ठोकले. सद्यःस्थितीमध्ये रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असले तरीही हा मुद्दा लोकसभा निवडणूक आखाड्यात रंगणार हे निश्चित आहे.www.konkantoday.com