
कळंबणीनजिक अपघात, चौघेजण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरी कळंबणीनजिक कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले. हे चौघेजण मुंबईहून शिमगोत्सवासाठी गुहार येथे येत होते. मुंबई येथील कुटुंब शिमगोत्सवासाठी एम.एच. ४७/एबी ९५०३ क्रमांकाच्या कारने गुहागर येथे येत असताना चालकास झोप अनावर झाल्याने कार रस्त्याच्या दुभाजकावर चढली.चालकाने प्रसंगावधान राखत पुन्हा कार रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न करत असताना मागी टायर फुटून डाव्या बाजूला उलटली. या अपघातात कारमधील चौघेजण जखमी झाले. उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णवाहिका चालक आनंद घोले यांनी मदतकार्य केले. चौघांची प्रकृती गंभीर बनल्याने उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.www.konkantoday.com