बहिरवली भागात १० सक्शनपंपाने बेकायदा उत्खनन सुरू

शासनाची स्वस्त वाळू महाग झाल्याने तीची आता खरेदीच होत नाही. त्यामुळे ती कोमात गेली असून अनधिकृतपणे काढली जाणारी व स्वस्त मिळणारी वाळू जोमात असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून खेड तालुक्यातील बहिरवली भागात १० सक्शनपंपाने बेकायदा उत्खनन सुरू असून ही वाळू करंबवणे, केतकी, चिवेली, गांग्रई, कालुस्ते, करजी, सवणस व मुंबके येथे आणून बिनधास्तपणे विक्री केली जात आहे. तरीही खेड, चिपळूणमधील महसूल यंत्रणा व जिल्हा खनिकर्म विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button