उक्ताड रस्त्याच्या दुरावस्थेत आणखी भर, खासगी पाईपलाईनसाठी खोदला चक्क रस्ता
_लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या वा वॉरंटीपूर्वीच खराब होत चाललेल्या उक्ताड रस्त्याच्या दुरावस्थेत एका नागरिकाने आणखी भर टाकली आहे. आपली खासगी पाण्याची लाईन नेण्यासाठी चक्क रस्ता खोदला असून तो तसाच ठेवला आहे. या कामासाठी नगर परिषदेची परवानगी न घेतल्याने संबंधित मालकाला १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून त्याच्याकडून कामही करून घेतले जाणार आहे.काही वर्षे मागे जाता उक्ताड रस्ता खड्ड्याात गेला होता. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून हा रस्ता चकाचक करण्यात आला. सुरूवातीला या रस्त्याला आता बरीच वर्षे काहीही होणार नाही, असे अनेकांना वाटत होते. तर काहींनी काम बोगस असल्याची ओरड तेव्हाच केली होती. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही असे असताना आता वॉरंटी संपण्यापूर्वीच रस्त्याचा वरी थर वाहून गेला.www.konkantoday.com