राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यात मोठी कारवाई, सुमारे ९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याशिवाय टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजापूर तालुक्यातील मौजे पन्हाळे येथील हॉटेल सिध्दांतच्या बाजूस वाहन तपासणी करत असताना पहाटे ४.३० ते ५.३० चे सुमारास अशोक लेलँड कंपनीचा दोस्त स्ट्राँग मालवाहक चारचाकी टेंम्पो (एमएच-०७एजे-०३६१) संशयास्पद रित्या जाताना दिसला. पथकाने था टेम्पो थांबवून तपासणी केली असता या वाहनातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेले व फक्त गोवा राज्यात विक्री करीता असलेले गोवा बनावटीचे विदेशी मद्य गोल्डन एस व्हिस्की ७५० मिलीचे एकूण ६० बॉक्स ज्यात एकूण ७२० सिलबंद प्लॅस्टिक बाटल्या व गोल्ड अॅण्ड ब्लॅक रम ७५० मिलीचे एकूण ४० बॉक्स ज्यात एकूण ४८० सिलबंद प्लॅस्टिक बाटल्या मिळून आल्या. गोवा बनावट विदेशी मदयाची किंमत रु.६,००,००० व वाहनाची किंमत रु.३,७५,००० असा एकूण रु.९,७५,००० किंमतीचा मुददेमाल मिळून आला.सदर गुन्हामध्ये वाहनचालक संतोष गंगाराम खरात (मांजरदोरावाडी, गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या इसमास अटक करण्यात आलेली असून त्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) व ९० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये अमित पाडळकर, निरीक्षक, सचिन यादव, दुय्यम निरीक्षक, मानस पवार, वैभव सोनावले, जवान, मलिक शे. धोत्रे, जवान-नि-वाहनचालक व श्रीमती. सुजल घुडे, महिला जवान यांनी सहभाग घेतला. आपल्या परिसरात होणा-या हातभटटी, अवैध देशी तसेच विदेशी दारु, बनावट दारु, परराज्याची दारु निर्मिती, वाहतूक साठवण किंवा विक्री बाबत माहिती असल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करुन समुळ उच्चाटन होण्याकरीता आपण भ्रमणध्वनी क्र.८४२२००११३३ व टोल फ्रि क्र.१८००२३३९९९९ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button