किरण सामंत जनतेच्या मनातील उमेदवार- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अद्याप अनिश्चितता असतानाच या मतदारसंघात महायुतीतच उमेदवार विजयी होईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे किरण सामंत हे जनतेच्या मनातील उमेदवार आहेत असेही सामंत यांनी म्हटले आहेशिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आमचा उमेदवार निवडून येईल कोणीही मतदारांना गृहीत धरून गर्व करू नये इंदिरा गांधींचा देखील पराभव झाला होता असा टोमणा खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता सामंत यांनी लगावला सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी अद्याप जाहीर झालेले नसून हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळणार की भाजपाला याबाबत अद्याप निश्चित झालेले नाहीwww.konkantoday.com