
देवरूख येथे ९ रोजी मनसे रिक्षा सुंदरी स्पर्धांचे आयोजन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संगमेश्वर-देवरूख- साखरपा) व मनसे रिक्षा संघटना देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी देवरूख मनसे रिक्षा सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्हा मर्यादीत ही स्पर्धा संगमेश्वर पंचायत समिती समोरील मैदानात अ व ब अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ११ हजार १८ रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार १८ रुपये, तृतीय क्रमांका ५ हजार १८ रुपये व प्रत्येकी आकर्षक चषक देवून सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेच्या माहितीसाठी ऋतुराज देवरूखकर, निलेश खेडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे सुचित करण्यात आले आहे.www.konkantoday.com