
मंडणगड तालुक्यातील पालकोंड येथे जनरेटरने पेट घेतल्याने दुचाकीसह लाखोंचे नुकसान
मंडणगड तालुक्यातील पालकोंड या गावातील कातळ परिसरात मंगळवारी विद्युत जनित्राजवळ स्पार्किंग होवून जनित्राने पेट घेतल्याने लगतच्या गवताला लागलेल्या आगीचे रूपांतर वणव्यात झाले. यामध्ये विनावापर असलेला गोठा, जळावू लाकडे तसेच आगीच्या झळीमुळे घराच्या अंगणात उभी असलेली दुचाकी जळून खाक झाली व काजूची बागही होरपळून गेली. या आगीत लाकडाचा मोठ्या प्रमाणात जाळ निर्माण झाल्याने लगत असलेल्या सुमन बटावले यांच्या घराच्या अंगणात उभी करण्यात आलेल्या दुचाकीवरी प्लास्टीकनेही पेट घेतला. यामुळे लागलेया आगीत दुचाकी जळून खाक झाली. www.konkantoday.com