मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटदरम्यान अपघात झाल्यास अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाट यादरम्यान येथून पुढे अपघात झाला तर ठेकेदार कंपनी आणि अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांनी केली आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षापासून रगडलेले आहे. त्यातील कशेडी घाट ते परशुराम घाट या दरम्यानचे काम अत्यंत घाईगडबडीत व कोणतेही सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार न करता केले आहे. रस्ता झाल्यानंतर ठिकठिकाणी केलेले अंडरपास बोगस व उपयोगाविना आहेत. त्याचा वापर माणसे सोडा प्राण्यांनादेखील होणार नाही. अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. याच टप्प्यात अजूनही सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले नाही. डायव्हर्शनदेखील चुकीच्या पद्धतीने केले आहेत. भरणेनाका येथील जगबुडी नदीवरील वक्राकार वळणामुळे व विचित्र रस्त्याच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात १५ हून अधिक अपघात झाले असून ४ जणांना आपला जीव गमवाला लागला आहे. भोस्ते घाटातील अवघड वळणावर आजपर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. अपघात होवू नये म्हणून टाकलेल्या मोठ मोठ्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात व्हायला लागले आहेत. भोस्ते घाटाच्या मध्यभागी महामार्गालगत पश्‍चिमेला दगड आणि मातीसाठी मोठा खड्डा खोदला असून पावसाळ्यात त्यात पाणी साठते व अपघात होतात. इतर वेळीदेखील या खड्ड्यांमुळे १५ ते २० ट्रक त्या खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button