
भोईवाडा पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल
_शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.आता मुंबई भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांनी निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केली. यावरून सत्ताधारी पक्षाने संजय राऊत यांना चांगलेच धारेवर धरले आहे. www.konkantoday.com