अभ्यास दौर्यासाठी स्पेनच्या नागरिकांनी दिली लांजाला भेट
लांजा येथील भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्थेच्या माध्यमातून स्पेन येथील अभ्यास गटाने नुकतीच लांजा परिसराला भेट दिली. या अभ्यास गटात स्पेन येथील महिला पत्रकार, बँकेतील अधिकारी,सामाजिक महिला कार्यकर्त्या, राजकीय क्षेत्रातील महिला व पर्यटनातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. भारतात काम करणार्या संस्थांशी संपर्क साधून अभ्यास केला जात असल्याचे स्पेन येथील अभ्यासगटाने सांगितले.त्यांनी कृषी विषयक पाहणी केली. झापडे येथील प्रगत शील शेतकरी हरिश्चंद्र देसाई यांच्या बागेला ही त्यांनी भेट दिली. कोकणातील निसर्गाने आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com