
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकसोहळा छत्रपती संभाजीराजे यांचे उपस्थितीत साजरा होणार
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
www.konkantoday.com