
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन.
रत्नागिरी : शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून व रत्नागिरी जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्तात्रय कदम यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) भागातील पाचही तालुक्यांत विविध कार्यक्रमांनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी पाच तालुक्यातील ग्राममंदिरामध्ये २६ व २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्तात्रय कदम यांनी केले आहे.




