
महाराष्ट्र राज्य लवकरच मास्कमुक्त करण्याचा विचार ,मास्क संदर्भात टास्क फोर्सशी चर्चा करून धोरण ठरविणार
राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. पण महिन्याअखेरीस कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आतापर्यंत मास्क हे अत्यंत प्रभावी शस्त्र ठरले आहे.पण आता कोरोनाची ओसरती लाट पाहता राज्य मास्कमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यानंतर मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का?
अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. राज्यातही मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे राज्यात मास्क वापरणे आता गरजेचे नसणार अशी चर्चा यावेळी झाली. मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण होणार आहे.
www.konkantoday.com