दिवा-चिपळूण या रेल्वेगाडीत प्रवाशाचा मोबाईल चोरणार्‍याला रंगेहाथ पकडले

दिवा-चिपळूण या रेल्वेगाडीत प्रवाशाचा मोबाईल चोरणार्‍या चोरट्यास मंगळवारी प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.अमित तुळशीराम गायकवाड (३२, दिवा-मुंबई) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सुनील विठोबा कदम (रेल्वे पोलीस-चिपळूण रेल्वे स्थानक) यानी दिली. दिवा-चिपळूण ही रेल्वे रात्री चिपळूण रेल्वेस्थानकादरम्यान आली असता अमित हा प्रवाशाचा मोबाईल चोरत होता. त्याक्षणी हा प्रकार त्या प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडून प्रवाशांनी चिपळूण रेल्वेस्थानक पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे पोलिसांनी चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानुसार, अमित याला अटक करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button