
राजापुरातील नॅशनल इंग्लिश स्कूल अॕण्ड ए. ई.कळसेकर महाविद्यालयात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबिर.
रत्नागिरी, दि. २४ : शासकीय विश्रामगृह, राजापूर येथे दुरूस्तीचे कामकाज सुरू असल्याने नागरिकांच्या सोयीकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबीराचे कामकाज हे नॅशनल इंग्लिश स्कूल अॕण्ड ए. ई. कळसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अॕण्ड कॉमर्स महाविद्यालयात करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत राजापूर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, वाहनाची पुनःनोंदणी व नविन वाहनांच्या नोंदणीचे कामकाज शिबिरात पार पाडले जाते. हे कामकाज शासकीय विश्रामगृह, राजापूर येथे करण्यात येत होते. परंतु, शासकीय विश्रामगृह राजापूर येथे दुरूस्तीचे कामकाज सुरू असल्यानेनागरिकांच्या सोयीकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबीराचे कामकाज हे नॅशनल इंग्लिश स्कूल अॕण्ड ए.ई.कळसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अॕण्ड कॉमर्स महाविद्यालय, राजापूर दसूर रोड, येथे करण्यात येणार आहे.000