कादवड येथील दोघींच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट होणार -जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी

चिपळूण तालुक्यातील कादवड येथील वैतरणा नदीच्या किनार्‍यावर दोन शाळकरी मुलींचा मृत्यू प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. प्रथम दर्शनी कोणताही घातपात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे अचूक निदान होणार आहे. न्याय वैद्यक प्रयोगशाळेला पत्रव्यवहार करून अहवाल तात्काळ देण्याची सूचना करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.वैतरणा नदीच्या पात्रात कातवड-कातकरवाडीतील मधुरा लवेल जाधव (१६, रा. पोसरे, खेड), सोनाली राजेंद्र निकम (१६, रा. कादवड) या दोन नववीतील मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवून झाल्यानंतर त्यांनी कपडे वाळत घातले होते. बादली उलटी ठेवून त्या कपडे सुकण्याची वाट पाहत होत्या. याच कालावधीत त्यांचा मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button