भालवली-खालचा भंडारवाडा (ता. राजापूर) येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर उकळता चहा ओतला
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर उकळता चहा ओतण्याचा प्रकार घडला आहेभालवली-खालचा भंडारवाडा (ता. राजापूर) येथे हा प्रकार घडला . यामध्ये विवाहित महिला १५ टक्के भाजली. प्रथम उपचारासाठी तिला धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल कऱण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.सौ. निशा नवनाथ तोडणकर (वय ३८, रा. भालवली, राजापूर) असे १५ टक्के भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) सकाळी अकराच्या सुमारास भंडारवाडा-भालवली येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भालवली येथे शेजाऱी रहाणाऱ्याबरोबर किरकोळ भांडण झाले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या निशा तोडणकर हिच्यावर उकळती चहा ओतण्यात आली. यामध्ये त्या १५ टक्के भाजल्या तत्काळ उपचारासाठी निशाच्या पतीने धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com