जिल्हा आरोग्य समितीवर दापोलीचे डॉ. विनोद जोशी
धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रूग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता गठीत जिल्हास्तरीय समितीवर दापोली येथील डॉ. विनोद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर समितीवर जिल्ह्यातील विधानसभा, विधानपरिषद, सदस्य, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक सामाजसेवक, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांची नियुक्ती मंत्री (विधी व न्याय) यांच्या मान्यतेने करण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार जिल्हासमितीमध्ये डा. विनोद जाोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. www.konkantoday.com